धनगर समाजाचा नागपूरला विधानभवनावर निर्धार मोर्चा

धनगर समाजातर्फे नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विधानभवनावर विविध मागण्यांसाठी निर्धार मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. विकास महात्मे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

धनगर समाजातर्फे नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विधानभवनावर विविध मागण्यांसाठी निर्धार मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. विकास महात्मे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतील ३६व्या कलमात देशातील विविध जातींचा उल्लेख करताना धनगर/धनगड असे म्हटले आहे. घटनेत या दोन्ही जाती एकच असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आम्हाला अनुसूचित जातीत घ्यावे, अशी आमची मागणी नसून धनगर व धनगड एकच आहेत. घटनेनुसार त्या निर्णयाची फक्त अंमलबजावणी करा या व अन्य मागण्यांसाठी १९ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर समाजातर्फे निर्धार मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कोणत्याही पक्षातर्फे नाही. मोर्चात समाजाचे सर्वच पक्षांतील कार्यकत्रे, नेते सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
देवनागरी लिपीत र, ड हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. देशात धनगड ही जातच नाही. धनगड म्हणजे धनगर अथवा एखाद्या राज्यात कुर्मा, मेषपालक असा उल्लेख केला जातो. समाजातील शिक्षणाचा अभाव, तसेच राजकीय नेतृत्वाअभावी राज्यात मोठय़ा प्रमाणात लोकसंख्या असूनही या समाजाचा प्रश्न मिटला नाही. या मोर्चानंतर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्यांच्या खुच्र्या डळमळीत होतील, असा इशारा डॉ. महात्मे यांनी दिला. सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी एम. जी. मांडुरके, श्रीरंग शेवाळे, राम माने, महेंद्र भादेकर, बापू मदने, राजपाल भंडे, राजेंद्र पाटील, धनराज माने आदी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nirdhar rally of dhangar community in vidhan bhavan

ताज्या बातम्या