आगरी विकास सामाजिक संस्थेच्या वतीने मद्यविना हळदी समारंभ साजरा करणाऱ्या २० आगरी कुटुंबांचा सत्कार  २४ ते २८ डिसेंबरदरम्यान ठाण्यात होणाऱ्या आगरी महोत्सवात करण्यात येणार आहे. ठाण्यातील आनंदनगर येथील महापालिका मैदानामध्ये होणाऱ्या महोत्सवामध्ये हा सत्कार होणार आहे.
आगरी समाजात लग्नापेक्षा हळदीचा कार्यक्रम मोठय़ा थाटामाटात साजरा करण्याची पद्धत पाहावयास मिळते. मद्याच्या पार्टीसह मांसाहारी मेजवाने आणि डीजेच्या दणदणाटात धांगडधिंगा, असे काहीसे चित्र हळदीला असते. ही वाईट प्रथा बंद करण्यासाठी आगरी समाजातील या वाईट प्रथेमुळे चांगल्या परंपरा झाकोळल्या जात आहेत. त्यांना उजाळा देण्याचा प्रयत्नही संस्था करणार आहे.