सिडको वसाहतीला पाणीपुरवठा करणारी एमजीपेची जलवाहिनी ठिकठिकाणी फुटल्याने सोमवारी दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात आला. याबाबतची वर्तमानपत्रातून आणि रिक्षातून लाऊडस्पीकरच्या भोंग्यावाटे पूर्वकल्पना रहिवाशांना मिळाली नाही. त्यामुळे मंगळवारी, बुधवारी रहिवाशांची एकच तारांबळ उडाली.  
याचा सर्वात मोठा फटका पनवेल, कळंबोलीतील बैठय़ा वसाहती, सिडकोने बांधलेल्या इमारतींमधील नागरिकांना बसला. बुधवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नवनीत सोनावणे यांनी सांगितले.