सागवानांची अवैध तोड प्रकरणी अधिकारी व कर्मचारी निलंबित

सागवान वृक्षांची अतोनात अवैध तोड होत असतानाही कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वनविभागाने चौकशीअंती निलंबित केले आहे.

सागवान वृक्षांची अतोनात अवैध तोड होत असतानाही कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वनविभागाने चौकशीअंती निलंबित केले आहे.
पांढरकवडा तालुक्यातील मोदादी जंगलात सागवान वृक्षांची अवैध तोड होत असल्याच्या तक्रारी पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. सखोल चौकशीनंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार सरकारने मुकुटबन येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विजय कडू, वनपाल व्ही.जी. राननवरे, वनरक्षक व्ही.एस. रनमले आणि चौकीदार रमेश नकशेट्टीवार, कुंडेकर, अशा पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Officers employees suspended for illegal cutdown of trees