भविष्य निर्वाह निधीचे कर्ज देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पालिका शिक्षण मंडळ अधिकाऱ्यास  शहादा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.   शहादा नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रवींद्र जयराम पानपाटील यांनी तक्रारदारास दूरध्वनी करून कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती देत दोन हजार रुपयांची मागणी केली. शनिवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात पानपाटील हा अडकला. लाच घेताना त्यास अटक करण्यात आली.