मागील एक महिन्यापूर्वी किलोला पन्नाशी गाठलेल्या कांद्याचे दर गेल्या आठवडय़ापासून कोसळत आहेत. शुक्रवारी बाजारपेठेत प्रितिक्वटल कांद्याचा दर एक हजारापर्यंत खाली आला. लागवडीपासून काढणीपर्यंत परिश्रम व मोठय़ा प्रमाणात पसा खर्च केलेल्या कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. सरकारकडून कांद्याची निर्यात सुरू करण्याबद्दल पावले उचलली जात नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुळातच कांदा पीक म्हणजे जुगारच असल्याचे मानले जाते. नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक असल्यामुळे जिल्हय़ातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला. विशेषकरून तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा परिसरात या पिकाचे उत्पादन घेतले जाते. रांगडा कांदा उत्पादनासाठी अपसिंगा पट्टा नावारुपास आला. मागील सलग १० वषार्ंतील या पिकाचा अनुभव पाहिला, तर २०१०-११चा हंगाम वगळता बाकी कोणत्याच हंगामात कांदा उत्पादकांच्या पदरात फारसे काही पडले नाही. प्रत्येक हंगामात कधी भाव कोसळण्यामुळे तर कधी निसर्गाच्या अवकृपेमुळे कांदा उत्पादकांना प्रचंड आíथक फटका बसला आहे. मागील दोन वषार्ंत कमी झालेल्या पावसामुळे  कांद्याचे पीक जागेवरच जळून गेले होते.  
यंदाही ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात जिल्हय़ात शेतकऱ्यांनी कांदा लागवडी उरकून घेतल्या. लागवडीनंतर ऑक्टोबर महिन्यात किलोला पन्नाशी गाठलेले या वर्षी नक्कीच फायदा होणार असे स्वप्न शेतकऱ्यांना पडू लागले. काढणी सुरू झाली आणि दर घसरला. ते प्रतििक्वटल ३ हजार रुपये तर टिकून राहतील, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु डिसेंबर महिना उजाडताच बंगळुरू, हैदराबाद, सोलापूर, नाशिक जिल्हय़ातील निफाड, लासलगाव, मनमाड या बाजारपेठेत कांद्याचे भाव दिवसाला खाली येत राहिले.
मजुरीचे वाढते दर, बियाणे, खते, फवारणीची औषधे, मशागत आणि काढणी या सर्वाच्या खर्चात भरमसाठ वाढ झाली. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत सरासरी ४५ ते ५० हजार रुपये खर्च येत असल्याचे अपसिंगा येथील कांदा उत्पादक शेतकरी भुजंग नरवडे, चंद्रकांत नरुळे, रामेश्वर गोरे, मुकुंद तोडकरी यांनी सांगितले. मागील तीन-चार वर्षांच्या तुलनेत एकरी खर्चात जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यंदा कांदा लागवडीनंतर सातत्यानेच निसर्गाची अवकृपा झाली. अधूनमधून सतत करपा, टक्का आदी रोगांचा या पिकांवर प्रादुर्भाव होत राहिल्याने कांद्याची वाढ खुंटली गेली. कांदा अपेक्षेनुसार पोसलाच नाही. परिणामी कांद्याचा एकरी उतार निम्म्यावर खाली आला आहे. एकरी सरासरी १० टन उत्पादन निघणे आवश्यक मानले जाते. परंतु चालू हंगामात केवळ केवळ पाच ते सहा टनापर्यंत कांद्याचा उतार मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम वाहतूक खर्चात वाढ होण्यावर थेट झाला. तुळजापूर तालुक्यातून बंगळुरू येथील बाजारपेठेत ट्रकने कांदा नेण्यासाठी १० टनाला २६ हजार रुपये एवढे भाडे शेतकऱ्यांना बसत आहे. तर हैदराबाद बाजारपेठेत माल नेण्याकरिता १० टनास १४ हजार रुपये खर्च येत असल्याचे संजय िपपरकर यांनी सांगितले.