माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये भारत प्रगती करीत असताना विद्यार्थ्यांंना अत्याधुनिक सेवा निर्माण करून देण्याचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा प्रयत्न आहे. पुढील शैक्षणिक वर्षांंपासून प्रायोगिक तत्त्वावर एक अभ्यासक्रम मोबाईलद्वारे  उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दिली.ं
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने केंद्र प्रमुख आणि केंद्र संयोजकांची व्हीएमव्ही महाविद्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी साळुंखे यांनी माहिती दिली. बैठकीला नागपूर विभागीय केंद्राचे संचालक डॉ. रमेश सेनाड, प्राचार्य मुरलीधर चांदेकर, डॉ. आर.डी. मेहता, व्हीएमव्ही महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष चंद्रकातभाई ठाकर उपस्थित होते.
आजच्या घडीला शिक्षणासाठी इंटरनेट हे सर्वात उपयुक्त आणि उत्तम माध्यम आहे. याचा उपयोग करून विद्यार्थ्यांंना घरबसल्या पुस्तके उपलब्ध होऊ शकतात. आतापर्यंत जवळपास शंभराहून अधिक शिक्षणक्रमाची ५०० पुस्तके मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही अभ्यासक्रमात बदल करून नव्याने संरचना करण्यात येणार आहे. शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांंना उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम अंत्यत उपयुक्त आहे आणि त्याचा लाभ त्यांनी घ्यावा.
 विद्यार्थ्यांंचा अध्ययन साहित्यावर अधिक खर्च होऊ नये यासाठी विद्याथ्यार्ंना मुक्त विद्यापीठाच्या विद्याथ्यार्ंची जुनी पुस्तके उपलब्ध झाल्यास प्रवेश शुल्कातून अध्ययन साहित्याची रक्कम वजा केली जाईल. आगामी वर्षांपासून पुनर्मूल्यांकन पद्धत सुरू करणार आहे.
विद्यापीठाचा विस्तार राज्यात मोठय़ा प्रमाणात झाल्याने लवकरच प्रत्येक जिल्ह्य़ाच्या एक केंद्र स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले. अनुसूचित जाती जमाती, इतर मागास समाजातील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना केंद्र व राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात शिष्यवृत्तीचा लाभ मोठय़ा प्रमाणात घेता यावा यासाठी प्रयत्न केले जातील, असेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
या वेळी प्राचार्य मुरलीधर चांदेकर यांनी मुक्त विद्यापीठाच्या उच्च शिक्षणासाठी असलेल्या विविध अभ्यासक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांंना या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. रमेश सेनाड यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयातर्फे डॉ. साळुंखे यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख आणि केंद्र समन्वयक यांनी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीबाबत सूचना केल्या.