जामवाडी शिवारात सापडलेला मृतदेह वंजारवाडा येथील एकनाथ माधवराव बांगर याचा असल्याचे तपासात आढळून आले. अनतिक संबंधात अडथळा ठरल्याने त्याचा पत्नीसह अन्य आरोपींनी खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणी पत्नीसह तिघांना अटक केली. प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता आरोपींना ४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
शहरापासून काही अंतरावर बुधवारी सकाळी एकनाथ बांगर याचा मृतदेह पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याच्याजवळ मिळालेल्या मोबाईलचे कॉल विवरण (सीडीआर रिपोर्ट) तपासले. शेवटचा कॉल मयताची पत्नी मंदाबाईचा असल्याने तिला ताब्यात घेतले. तिनेच पोलिसांना कबुली दिली. या प्रकरणात श्यामराव बांगर यांच्या फिर्यादीवरून तिघांना अटक केली. अमृता लहानुजी कांबळे (ग्रामसेवक, आनंदनगर, िहगोली), राजू पांडुरग गुठ्ठे (लुईकुंभी, तालुका मंगरूळपीर, हल्ली वंजारवाडा) व मंदाबाई एकनाथ बांगर अशी आरोपींची नावे आहेत. गुठ्ठे हा मयताच्या घरात भाडय़ाने राहत होता. एकनाथचा खून अनतिक संबंधातून झाल्याचे तपासात उघडकीस आले. त्याचे व मंदाबाईचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा खून झाल्याचे समोर आले.