आंबेडकरी चळवळीतील नेते, माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात उद्या (बुधवारी) व गुरुवारी प्रबुद्ध सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत एकनाथ रंगमंदिरात दुपारी ३ वाजता प्रसिद्ध विचारवंत डॉ. प्रदीप आगलावे (नागपूर) यांचे ‘जागतिकीकरण आणि आंबेडकरी चळवळीपुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी चार वाजता विविध सामाजिक, राजकीय संस्था संघटनांच्या वतीने गाडे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता परिवर्तनवादी कवींचे विद्रोही कविसंमेलन आयोजित केले आहे. प्रसिद्ध शायर बशर नवाज यांच्या अध्यक्षतेखाली शाहीर संभाजी भगत (मुंबई), चित्रपट गीतकार प्रकाश घोडके (पुणे), डॉ. आदिनाथ इंगोले (नांदेड), प्रा. विजयकुमार गवई, डॉ. प्रतिभा अहिरे, नारायण पुरी (औरंगाबाद) हे कवी यात सहभागी होणार आहेत. गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता पीरबाजार येथे राहुल आन्विकर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. संयोजन समितीने पत्रकान्वये ही माहिती दिली.