सध्या पदवीच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थाना स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करण्याची संधी ठाणे महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संस्थेच्या वतीने एक पूर्वतयारी वर्ग चालवण्यात येत असून या वर्गात प्रवेशासाठी बारावीत विज्ञान व वाणिज्य शाखेत ८५ टक्के आणि कला शाखेत ७५ टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. विद्यार्थानी कोऱ्या कागदावर आपले नाव, पत्ता, दूरध्वनी, मोबाइल क्रमांक, ई-मेल, शैक्षणिक अर्हता, गुणवत्ता इत्यादी तपशिलासह अर्ज करावा. या अर्जासोबत माध्यमिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची प्रत जोडणे आवश्यक असून ‘स्पर्धा परीक्षेला बसण्यास का रस आहे’ या विषयावर ३०० शब्दांत एक टिपण स्वहस्ताक्षरात लिहून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज २५ जुलैपर्यंत सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ यावेळेत  संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करावा. संपर्क – संचालक, चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, तळमजला, नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय, वेदांत शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर, कोरस रोड, वर्तकनगर, ठाणे.