मॅगीविरोधात आंदोलन

केंद्रासह राज्यांनी कठोर भूमिका घेऊनसुद्धा ऐरोली येथील डी मार्ट येथे आरोग्यास हानिकारक असलेल्या मॅगीची विक्री करण्यात येत असल्याने त्यांना जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबईच्या

केंद्रासह राज्यांनी कठोर भूमिका घेऊनसुद्धा ऐरोली येथील डी मार्ट येथे आरोग्यास हानिकारक असलेल्या मॅगीची विक्री करण्यात येत असल्याने त्यांना जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबईच्या वतीने येथे धडक दिली. या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे डी मार्ट येथील व्यवस्थापकाने मॅगीची विक्री करणार नसल्याचे आश्वासन देऊन डी मार्टमधील मॅगीची विक्री बंद केली.
राज्य सरकारने मॅगीबाबत अजून कोणतेही पाऊल उचललेले नसल्याने मार्केटमध्ये सर्रासपणे मॅगीची विक्री केली जात आहे. अशीच विक्री ऐरोली येथील डी मार्टमध्येही होत होती. पुन्हा येथे मॅगी विक्री केल्यास मोठे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले यांनी या वेळी दिला. या वेळी विभाग अध्यक्ष धनंजय भोसले, उपविभाग अध्यक्ष रुपेश कदम उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Protest against maggi noodles in navi mumbai