माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित ‘राजहंस’ या पुस्तकाचे प्रकाशन १२ ऑगस्टला होणार असून, या वेळी विविध राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी संपादित केलेल्या राजहंस या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी गोपीनाथ मुंडे, नारायण राणे, बाळासाहेब थोरात, सुनील तटकरे, अभिनेते प्रशांत दामले आणि विलासरावांच्या पत्नी वैशाली देशमुख उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ १२ ऑगस्ट रोजी रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये सायंकाळी ६ वाजता होणार आहे.