२०१४मध्ये मनसेतून एकमेव आमदार झालेल्या शरद सोनवणे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवबंधन बांधले आहे. शरद सोनवणे यांनी जुन्नर मधून अर्ज दाखल केला आहे. तर भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, खेड आळंदीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे तिन्ही आमदार कोटय़धीश असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जाबरोबर मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. त्यानुसार भोरचे आमदार थोपटे यांची मालमत्ता १२ कोटी ६० लाख रुपयांची आहे. रोख रक्कम, ठेवी, शेअर्स, राष्ट्रीय बचत योजना, सोने, जमिनी आदी मालमत्तेचा त्यात समावेश आहे. जुन्नरचे आमदार सोनवणे हेही करोडपती आहेत. सोनवणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार होते. मनसेतून ते शिवसेनेत गेले आहेत. त्यांची मालमत्ता तीन कोटी ४५ लाख रूपयांची आहे.

खेळ आळंदीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मोहिते यांच्या नावावर नऊ  कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना स्वत:च्या मालमत्तेची माहिती देण्याबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रावर निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक करण्यात आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेली विदेशातील गुंतवणूक आणि बँकांकडे असलेली थकबाकी याचाही तपशील देणे बंधनकारक आहे.

गेल्या पाच वर्षांतील आयकराचे विवरणही या प्रतिज्ञापत्रात द्यावे लागते. त्यानुसार या तीन उमेदवारांनी ही माहिती सादर केली आहे. उमेदवाराची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे किंवा कसे, हे मतदारांना समजण्यासाठी उमेदवारांना प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती द्यावी लागते. उमेदवारांविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्य़ांचे फलक मतदार केंद्रांबाहेर लावण्याचे आदेश यापूर्वीच निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे उमेदवाराचे चारित्र्य मतदारांना कळणार आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या पक्षांच्या दोन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तर विशेष म्हणजे भाजपाच्या दोन्ही यांद्यामध्ये नाव नसलेल्या पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी पहिली यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangram thopate sharad sonwane dilip mohite are billionaire bmh
First published on: 03-10-2019 at 09:03 IST