संगणकीय प्रगत तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी हक्क, जबाबदारीची जाणीव ठेवून पारदर्शक कामकाज करावे. यातून विभागाची प्रतिमा उंचावण्यास सतत दक्ष राहावे, असे प्रतिपादन राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे नोंदणी महानिरीक्षक एस. चोक्किलगम यांनी केले.
नोंदणी व मुद्रांक विभागाचे विभागस्तरीय चर्चासत्र संत तुकाराम नाटय़गृहात पार पडले. त्याचे उद्घाटन करताना चोक्कलिंगम बोलत होते. सहनोंदणी महानिरीक्षक डॉ. संजय कोलते, विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, लातूर विभागाचे प्रभारी नोंदणी उपमहानिरीक्षक बी. आर. बारकुल, नोंदणी उपमहानिरीक्षक पी. एन. अहिरराव व डी. यू. साळुंके यांच्यासह आठही जिल्हय़ांतील सहजिल्हा दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक व संबंधित अधिकारी उपस्थित होते. आधुनिक संगणकीय प्रणालीमुळे कामकाजात सुसूत्रता येऊन दस्तऐवजांची योग्य प्रकारे नोंदणी होण्यास मोठा फायदा होत असल्याचे चोक्किलगम यांनी नमूद केले.
डॉ. कोलते यांनी ई.एस.बी.टी.आर. प्रणाली, एस.जी.खुर्द यांनी ई-पेमेंट प्रणाली, पी. एन. अहिरराव यांनी ई-चालन, एस. ए. िहगोणे यांनी फाईिलग व ई- फायिलग आदींनी वेगवेगळय़ा विषयांवर माहिती दिली. नवीन तंत्रज्ञान युगाच्या प्रगतीच्या वाटचालीत हे चर्चासत्र घेतल्याचे प्रास्ताविकात लवांडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन नोंदणी विभागाचे अनंत कुलकर्णी यांनी केले. सहजिल्हा निबंधक एस. एम. जाधव यांनी आभार मानले.