मध्य नागपूचा पाणीपुरवठा बळकट करण्यासाठी नागपूर महापालिका व ओसीडब्ल्यूने सीताबर्डी किल्ला येथील जलकुंभाच्या पुनर्बाधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. महापौर अनिल सोले, जलप्रदाय समिती अध्यक्ष सुधाकरराव कोहळे व एनईएसएलचे संचालक प्रवीण दटके यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
सध्या सेमिनरी हिल्स येथील एमबीआरएसप्रमाणेच सीताबर्डी किल्ला येथेही फोर्ट १ व फोर्ट २ असे दोन जलकुंभ आहेत. या जलकुंभातून मुख्यत्वे शहराच्या मध्य भागाला पाणीपुरवठा होतो. या अतिशय जुन्या जलकुंभापैकी किल्ला २ हे जलकुंभ पूर्णपणे उद्ध्वस्त करून त्याच जागी नवीन जलकुंभ बांधण्यात येतील. पोर्ट २ जलकुंभ जवळजवळ ५० वषार्ंपूर्वी बांधण्यात आले होते. तेव्हापासून त्याची डागडूजी झाली नाही. या कामामध्ये सीताबर्डी किल्ल्याच्या दोन टाक्याचे विलगीकरण करणे, या नवीन व्यवस्थेत पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी नवीन व्हॉल्व बसवणे व पाण्याच्या मोजमापासाठी फ्लो मीटर बसवणे इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2014 रोजी प्रकाशित
सीताबर्डी किल्ला जलकुंभाची पुनर्बाधणी सुरू
मध्य नागपूचा पाणीपुरवठा बळकट करण्यासाठी नागपूर महापालिका व ओसीडब्ल्यूने सीताबर्डी किल्ला येथील जलकुंभाच्या पुनर्बाधणीच्या कामाला सुरुवात केली आहे.
First published on: 29-08-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reconstruction of sitabuldi fort in nagpur