अपघातात महिला ठार, चारजण जखमी

गडिहग्जल गारगोटी मार्गावर (उत्तुर ता. आजरा) मारुती अल्टो (एमएच १२ सीके ७७१७) ने एस. टी.ला (एमएच २० डी ८५३७) पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली.

गडिहग्जल गारगोटी मार्गावर (उत्तुर ता. आजरा) मारुती अल्टो (एमएच १२ सीके ७७१७) ने एस. टी.ला (एमएच २० डी ८५३७) पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली. तर गाडीतील अन्य चारजण झखमी झाले. अपघाताची नोंद आजरा पोलिस ठाण्यात झाली आहे.
स्मिता प्रभाकर मुंज (वय ४५ ) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रभाकर मुरारी मुंज (वय ४९), सुलोचना मुरारी मुंज (वय ७८), मुरारी विनायक मुंज (वय ८४), निखिल प्रभाकर मुंज (वय २०, सर्व रा. विक्रम बात्रा रोड नुल्ला नगर पुणे) अशी जखमींची नावे आहेत.
     मुंज कुटुंबीय पुण्याहून आज सकाळी पणजीला आपल्या नातेवाईकांकडे निघाले होते. यावेळी उत्तूर येथे गाडी आली असता बस थांब्यावर थांबलेल्या एसटीला अल्टो कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये स्मिता, प्रभाकर, सुलोचना, मुरारी हे गंभीर झखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सी.पी. आर रुग्णालयात दाखल केले असता स्मिता यांचा मृत्यू झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Road accident died kolhapur