घरफोडी प्रकरणात चोरटय़ासह सोनाराला अटक

सानपाडा येथे घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरटय़ाला तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कोपरखैरणे परिसरातील एका सोनाराला अटक करण्यात आली असून, दोघांकडून सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सानपाडा येथे घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरटय़ाला तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कोपरखैरणे परिसरातील एका सोनाराला अटक करण्यात आली असून, दोघांकडून सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  
तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना सानपाडा गावात घरफोडी करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. माहितीवरुन सेक्टर ५ येथील स्मशानभूमीजवळ आलेला गोरख म्हात्रे याला अटक करण्यात आली होती.  कोपरखैरणे पोलिसांनी त्याला दोन वर्षांकरिता तडीपार केले होते.  तुर्भे, रबाळे, ठाणे, मुरबाड आणि रत्नागिरी आदी ठिकाणी २० घरफोडय़ा त्याने केल्याची कबुली दिली आहे.  त्याच्याकडून पोलिसांनी २ लाख २ हजार ५५० रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि दागिने विक्रीतून आलेली २ लाख ९५ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली.  यापूर्वीचे दागिने कोपरखैरणे येथील  लक्ष्मण कुमावत या सोनाराला विकल्याची कबुली त्याने दिली असून, या प्रकरणात कुमावत यालादेखील अटक करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Robber and jewellers arrested in house breaking case

Next Story
मुजोर रिक्षावाल्यांचा कामोठय़ात बससेवेला विरोध
ताज्या बातम्या