ग्रामीण किंवा दुर्गम भागात आरोग्यसेवा पुरविणाऱ्या १० वैद्यकीय व्यावसायिकांना दूरदर्शनच्या ‘सह्याद्री ’ वाहिनीने नुकतेच ‘संजीवनी’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.
वैद्यकीय व्यावसायिकांच्या या कामाचा आदर्श घेऊन तरुण वैद्यकीय व्यावसायिकांनी ग्रामीण किंवा दुर्गम भागातही वैद्यकीय व्यवसाय करावा आणि ग्रामीण भागात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या या ‘देवदुतांच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहोचावी, या उद्देशाने दूरदर्शनच्या स’ााद्री वाहिनीचे अप्पर महासंचालक मुकेश शर्मा यांच्या संकल्पनेतून हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आहे.
संजीवनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या या वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये गडचिरोली जिल्’ाात आदिवासींसाठी ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाच्या माध्यमातून काम करणारे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, नागपूर येथील महात्मे आय बॅंक अ‍ॅण्ड वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. विकास महात्मे व डॉ. सुनिता महात्मे, जन्माच्या वेळी श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे नवजात बालकाच्या मेंदूला होणारी इजा, अंधत्व, अपस्मार याविषयी काम करणारे बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, अपघात झालेल्या व्यक्तिला पहिल्या एक तासाच्या आत उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो, या उद्देशाने ‘गोल्डन अवर’ हा उपक्रम सुरू केलेले डॉ. नरेंद्र वैद्य, दुर्गम भागात राहणाऱ्या महिलांना विशेषत: गरोदर महिला आणि लहान मुलांना आरोग्य सेवा पुरविणारे डॉ. स्मिता आणि रवींद्र कोल्हे, डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग, मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या ‘अस्तित्व’ या संस्थेचे संस्थापक डॉ. सुरेश आडकर, जन्मणाऱ्या बाळांमध्ये ‘एचआयव्ही’ पॉझिटिव्ह’चे प्रमाण कमी असावे, यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ. रेखा डावर, विंचू दंशावरील संशोधन आणि उपचार यासाठी काम करणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर, ग्रामीण आणि आदिवासींसाठी दंतोपचार करणारे डॉ. उल्हास वाघ यांचा समावेश होता.

श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे राज्यातील ३२ जिल्’ाांमधील आर्थिक दृष्टय़ा दुर्बल लोकांसाठी आरोग्य उपचारांसाठी २०१३-१४ या वर्षांत आठ कोटी रुपयांची मदत केली. त्याबद्दल न्यासाचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सह्याद्री संजीवनी पुरस्कार वितरण सोहळ्याचा वृत्तान्त ६ एप्रिल रोजी ४.०० वाजता आणि याच दिवशी रात्री दहा वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार आहे.