सिडको महामंडळाच्या वतीने नवी मुंबईमध्ये लोकाभिमुख प्रकल्प व पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. सिडकोकडून प्रकल्पबाधित लोकांसाठीसुद्धा कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
याच पाश्र्वभूमीवर प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना नवीन कार्यप्रणालीची ओळख व्हावी या उद्देशाने सिडको प्रशिक्षण केंद्राच्या वतीने प्रशिक्षणार्थी साहाय्यक अभियंता व वास्तुरचनाकार यांच्यासाठी २ जुलैपर्यंत शिवडी येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) येथे सॅप प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २८ प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रकल्प समन्वयक सुहास जोशी यांनी दिली.