माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना अप्रोपो गम्पशनची शिष्यवृत्ती

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अप्रोपो गम्पशनने प्रज्ञाशोध परीक्षा घेतली असून त्यामधून ३५० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. सायन्य अँड टेक्नॉलॉजी पार्क, केंद्रशासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि अप्रोपो गम्पशनने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अप्रोपो गम्पशनने प्रज्ञाशोध परीक्षा घेतली असून त्यामधून ३५० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. सायन्य अँड टेक्नॉलॉजी पार्क, केंद्रशासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि अप्रोपो गम्पशनने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांची प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आली असून त्यासाठी राज्यातील १ हजार ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधून ३५० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून जानेवारी २०१३ पासून या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे.   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Scholarship shouild be allowed to students who are making thier carrer in information tecnology