‘ज्येष्ठ नेते विखे वाढदिवस साजरा करणार नाहीत’

माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांचा वाढदिवस तारखेप्रमाणे १० एप्रिल रोजी असला, तरी तिथीप्रमाणे ५ मे रोजी साजरा करण्यात येत असतो, मात्र यावर्षी राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने, ते त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांनी सत्काराची रक्कम दुष्काळी कामांसाठी मदत म्हणून द्यावी असे आवाहन करण्यात आला आहे.

विखे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील दुष्काळी भागाचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांना दुष्काळाची दाहकता मोठय़ा प्रमाणात जाणवली. प्रामुख्याने पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा या समस्येबरोबरच रोजगार हमीची कामे वेळेत सुरु नसल्याने मजुरांचे होणारे हाल, सरकारी यंत्रणेची उदासिनता याच गोष्टी दौऱ्यात पुढे आल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Senior leader vikhe patil will not celebrate his birthday