आघाडी संपुष्टात आल्यानंतर शहर आणि जिल्ह्य़ात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या जाहीर सभांचा झंझावात सुरू असताना उद्या, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नागपूर जिल्ह्य़ात हिंगणामध्ये जाहीर सभा होणार आहे.
नागपूरमध्ये उद्या, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कस्तुरचंद पार्कवर सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा असताना दुसरीकडे जिल्ह्य़ात हिंगणा मतदारसंघात माजी मंत्री रमेश बंग यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची त्याच वेळेला जाहीर सभा होणार आहे.
शरद पवार वध्र्याची सभा आटोपून सायंकाळी ५ वाजता हेलिकॉप्टरने हिंगण्यामध्ये पोहोचणार आहे. जाहीर सभा झाल्यावर ते मराठवाडय़ाकडे रवाना होणार असल्याचे पक्षांकडून सांगण्यात आले.
दोन राष्ट्रीय पक्षातील नेत्यांच्या सभा असल्यामुळे कोणच्या सभेला जनतेचा जास्त प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.