उत्सवी उधळपट्टीचा आणखी एक नमुना
आगरी समाजातील लग्नसमारंभ तसेच अन्य कौटुंबिक कार्यक्रमांवर होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी या समाजातील विविध संघटना तसेच जाणकार नेते आवाहन करत असले तरी परिस्थिती फारशी बदललेली नाही. लग्न, मुंज, हळदी, वास्तुशांती अशा समारंभांसोबतच आता वाढदिवस सोहळय़ांनाही सार्वजनिक कार्यक्रमांचे स्वरूप देण्यात येत आहेत. त्यातच दिव्यामध्ये एका कुटुंबाने आपल्या मुलाचा ‘प्रथम दाढी’ समारंभ घडवून आणत सोहळय़ांच्या जंत्रीत आणखी एक भर पाडली आहे. अशा सोहळय़ांतून कौटुंबिक स्नेहमीलन आणि आनंद मिळत असला तरी त्यावर होणारा खर्च हे संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन असल्याची टीकाही होऊ लागली आहे.
बाळाचे जावळ काढण्याचा कार्यक्रम सर्वाना माहीत आहे. मात्र मुलगा वयात आल्यानंतर त्याचा ‘प्रथम दाढी’ समारंभ मोठय़ा थाटामाटात साजरा होणे ही प्रथा प्रथमच दिवा येथे पाहावयास मिळाली. विशेष म्हणजे, या सोहळय़ासाठी रीतसर पत्रिका छापण्यात आल्याच; पण या सोहळय़ाच्या निमंत्रणाचे जाहीर फलकही शहरात काही ठिकाणी लावण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे, शुक्रवारी २२ मे रोजी हा सोहळा धूमधडाक्यात पार पडला. या संदर्भात प्रयत्न करूनही संबंधित कुटुंबाशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, वाढदिवसालाही अमाप खर्च करून साजरा करण्याची राजकीय पद्धत आता सर्वत्र रूढ होऊ लागली आहे. निळजे गावचे माजी सरपंच सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नर्तिकेवर पैशांची उधळण केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. तर काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाच्या वाढदिवसानिमित्त शहरात शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केल्याचे समजते.
आगरी समाजातील आर्थिक उधळपट्टीविरोधात याच समाजातील अनेक मुले व जाणकार व्यक्ती आवाज उठवू लागली आहेत. पैशांची ही अनाठायी होणारी उधळपट्टी योग्य नाही, तरुणांना एक वेगळी वाट दाखविण्यासाठी ठाणे, नवी मुंबई, पनवेल या शहरातील युवक संघटनांनी एक दिवसात लग्न सोहळा, दारुविना हळदी केलेल्या कुटुंबाचा सत्कार, नाममात्र दरात सभागृह उपलब्ध असे वेगवेगळे उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. मात्र, त्याचा फारसा प्रभाव पडताना दिसत नाही. ‘दाढी वा वाढदिवस मोठय़ा प्रमाणात साजरे करणे उचित नाही. हे संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन आहे. युवक संघटनेच्या वतीने या प्रथांविरुद्ध जनजागृती केली जात आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘आगरी यूथ फोरम’चे अध्यक्ष गुलाब वझे यांनी या संदर्भात दिली.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?