scorecardresearch

श्रीशैल मल्लिकार्जुन रथयात्रा सोलापुरात सिध्देश्वर भेटीला

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर नऊशे वर्षांपूर्वी आपले गुरू श्री मल्लिकार्जुन यांची भेट घेण्यासाठी श्रीशैल येथे गेले व तेथे साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी सोलापुरात अध्यात्म पीठाची स्थापना करीत भूकैलास निर्माण केले.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर नऊशे वर्षांपूर्वी आपले गुरू श्री मल्लिकार्जुन यांची भेट घेण्यासाठी श्रीशैल येथे गेले व तेथे साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी सोलापुरात अध्यात्म पीठाची स्थापना करीत भूकैलास निर्माण केले. या थोर अध्यात्म परंपरेचे औचित्य साधून रथयात्रेच्या माध्यमातून श्रीशैलहून श्री मल्लिकार्जुन हे सिध्दरामेश्वरांच्या भेटीसाठी सोलापूरला आले. आहेत. बुधवारी सायंकाळी या भेटीचा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला.
श्रीशैलम् (आंध्र प्रदेश) येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान हे बारा ज्योतिलिंगांपैकी एक समजले जाते. या देवस्थान समितीच्या वतीने श्रीशैल मल्लिकार्जुन व भ्रमरांबिका विश्वशांती कल्याण महोत्सवानिमित्त (विवाह सोहळा) निघालेल्या श्रीशैल ते सोलापूर रथयात्रेचे आगमन सकाळी झाले. जोडबसवण्णा चौकात रथयात्रेचे आगमन झाल्यानंतर भव्य स्वागत झाले. तेथून शोभायात्रेस प्रारंभ झाला. सिध्दरामेश्वर यात्रेतील मानाच्या सात नंदिध्वजांसह निघालेल्या या शोभायात्रेत शेकडो सुहासिनी जलकुंभासह सहभागी झाल्या होत्या. विविध मार्गावरून ही शोभायात्रा सायंकाळी सिध्देश्वर मंदिरात पोहोचली. त्यानंतर मंदिराच्या सभामंडपात श्रीशैल मल्लिकार्जुन व श्री भ्रमरांबिका यांचा विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजय देशमुख, सिध्देश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सिध्देश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मेघराज काडादी, विश्वस्त मल्लिकार्जुन कावळे, नंदकुमार मुस्तारे, अॅड. आर. एस.तथा बाबू पाटील, अॅड.मिलिंद थोबडे, देवस्थानचे पुजारी राजेशेखर हिरेहब्बू, आनंद हब्बू यांच्यासह अनेक मान्यवरांचा या रथयात्रेच्या शोभायात्रेत सहभाग होता. यानिमित्ताने सिध्देश्वर मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र ( Punenagar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shrishail mallikarjuna siddheshwar festival celebrated in solapur

ताज्या बातम्या