महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालयाचे काम महिला दिनापासून सुरू झाले आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे चालवण्यासाठी विशेष न्यायालये सुरू करण्याचे उच्च न्यायालय प्रशासनाने ठरवले होते. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड यांनी या न्यायालयांची सुरुवात करण्यासाठी आदेश जारी केला. यापैकी दोन सत्र न्यायालये महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे हाताळतील, तर पाच न्यायालयांमध्ये महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराची प्रकरणे आणि पीडित महिलांची चालतील. यापैकी तीन नागपूर येथे, तर प्रत्येकी एक न्यायालय कामठी व उमरेड येथे आहे. या विशेष न्यायालयांमध्ये न्यायाधीशांपासून शिपायापर्यंत सर्व पदांवर महिलाच काम करतील.  
सध्या कार्यरत असलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेली लहान मुलींवरील अत्याचाराची प्रकरणेही विशेष सत्र न्यायाधीश विभा तांबी यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आली आहेत.

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
mumbai high court, state government, physically disabled persons
मुंबईतील अपंगस्नेही पदपथांचे प्रकरण : कायद्यांची पुस्तके कपाटात रचण्यासाठी आहेत का ? उच्च न्यायालयाचे खडेबोल