विभागीय आयुक्त व समितीचे अध्यक्ष अनूप कुमार यांनी विभागीय क्रीडा संकुल समितीची बठक घेऊन झालेल्या कामाचा व प्रगतिपथावरील कामाचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणेने कालमर्यादेत काम पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या.
    या बैठकीला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, अपर जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, कार्यकारी अभियंता पी. डी. नवघरे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
    प्रारंभी संतान यांनी अध्यक्ष व समिती सदस्यांचे स्वागत करून बठकीच्या कामकाजाला सुरुवात करण्याची विनंती अध्यक्षांना केली. प्रारंभी विषयपत्रिकेवरील क्रीडा संकुलातील चारशे मीटर सिंथेटिक रिनग ट्रॅक, पॅव्हेलियन बििल्डग व विविध क्रीडांगणे नागपूर सुधार प्रन्यासकडे वर्ग करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात येत असलेल्या संरक्षक िभतीचे बांधकाम व प्रवेशद्वाराच्या कामाबाबत चर्चा झाली. हे काम त्वरित पूर्ण करावे, असे निर्देश अध्यक्षांनी दिले. समिती सदस्यांनी त्याठिकाणी जाऊन कामाची पाहणी करावी, येणाऱ्या अडचणी व वस्तुस्थितीबाबत अध्यक्षांना माहिती द्यावी, असे बठकीत ठरले. यावेळी उपआयुक्त एम.एच. खान, नासुप्रचे अधीक्षक अभियंता एस.एच. गुज्जलवार व कार्यकारी अभियंता आनंदकुमार उपस्थित होते.