मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील शाळांमधील पदवीधर शिक्षकांसाठीची वेतनश्रेणी बी. एड. पदवीधर शिक्षकांना लागू केली आहे. मात्र यातून बी.पी.एड. पदवीधर शिक्षकांना म्हणजेच क्रीडा शिक्षकांना वगळण्यात आले आहे. यामुळे या शिक्षकांवर अन्याय झाला आहे.
क्रीडा शिक्षकांनाही पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहले आहे. मुंबई महापालिकेने ३ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढले होते. मात्र त्यातून क्रीडा शिक्षकांना वगळण्यात आले आहे. क्रीडा शिक्षकांनाही ही वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भात शिक्षण समिती अध्यक्षांच्या कार्यालयात बैठकही झाली होती. परंतु प्रत्यक्ष परिपत्रकात तसा उल्लेख नसल्यामुळे क्रीडा शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन परिपत्रकात बदल करावा अन्यथा विधिमंडळात या विरोधात आवाज उठविला जाईल असा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2015 रोजी प्रकाशित
क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर श्रेणीतून वगळले
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील शाळांमधील पदवीधर शिक्षकांसाठीची वेतनश्रेणी बी. एड. पदवीधर शिक्षकांना लागू केली आहे.
First published on: 27-02-2015 at 06:59 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports teachers reduced from graduating class