एलबीटीच्या विरोधात व्यापारी संघटनेच्या वतीने २२ एप्रिलपासून राज्यव्यापी बंद पुकारण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्य़ात १५ एप्रिलपासून भुसारमालाची खरेदी बंद केल्यामुळे व्यापारी उलाढालीवर मोठा परिणाम झाला.
एलबीटीविरोधात लातूरमधील व्यापाऱ्यांनी गेल्या काही महिन्यापासून प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानी गाऱ्हाणेही घातले. सरकारने लातूरबरोबरच संपूर्ण राज्यातील महापालिकांना एलबीटी लागू केली असल्यामुळे राज्यातील व्यापारी एलबीटीच्या विरोधात उतरले आहेत.
यापाऱ्यांनी भुसारमाल खरेदी बंद केल्याने जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासण्याची शक्यता वाढली आहे. लातूर बाजारपेठेत शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी आला तरी त्याला खरेदीदारच नसतील तर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.