शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी

शिक्षकाने केलेल्या मारहाणीत पाचवीच्या वर्गातील एक विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे ही घटना घडली.

शिक्षकाने केलेल्या मारहाणीत पाचवीच्या वर्गातील एक विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे ही घटना घडली.
त्रिंबकपूर येथील अनिकेत सुनील नरोडे हा विद्यार्थी देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिकतो. आज शाळेत त्याला कल्हापुरे या शिक्षकाने मारहाण केली. त्याचे डोके जमिनीवर आपटले. नंतर तो घरी रडत आला. घरी येताच उलटी होऊन तो बेशुद्ध पडला. त्याला प्रथम देवळाली प्रवरा येथील रुग्णालयात नेण्यात आले. नंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले आहे. मेंदूला मार लागला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांकडे यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Student seriously injured after beating by teacher

ताज्या बातम्या