जिल्हा न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न

शेतजमिनीचा दाव्याच्या प्रकरणात न्यायालयात आलेल्या वृद्धाने मंगळवारी जिल्हा न्यायालयात विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

शेतजमिनीचा दाव्याच्या प्रकरणात न्यायालयात आलेल्या वृद्धाने मंगळवारी जिल्हा न्यायालयात विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

दत्तात्रय मुढे (७०) असे त्यांचे नाव आहे. इगतपुरी तालुक्यातील ते रहिवासी आहेत. शेतजमिनीवरून न्यायालयात खटला सुरू आहे. मंगळवारी सकाळी ते न्यायालयात आले. या ठिकाणी त्यांना बंद लिफाफ्यात पत्र देण्यात आले. या वेळी त्यांनी खिशातून विषारी औषधाची बाटली काढली. ही बाब कर्मचारी व नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी हस्तक्षेप करून त्यांना रोखले. दरम्यानच्या काळात पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी गवळी यांना ताब्यात घेतले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suicide attempt in nashik district court

ताज्या बातम्या