सततची नापिकी व यंदा पडलेला ओला दुष्काळ यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेल्या दत्ता जाधव (वय २८) या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. किनवट तालुक्यातील मांडवी येथे दत्ता जाधव उदरनिर्वाहासाठी शेती करीत होता. त्याच्या डोक्यावर ५० हजारांचे कर्ज झाले होते. सततची नापिकी व यंदाचा दुष्काळ त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत तो गेल्या अनेक दिवसांपासून होता. यातूनच त्याने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेतला. मांडवी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2013 रोजी प्रकाशित
कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
सततची नापिकी व यंदा पडलेला ओला दुष्काळ यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेल्या दत्ता जाधव (वय २८) या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

First published on: 27-07-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of bankrupt farmer