उन्हाळ्यातील सुटीमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने नागपूरमार्गे बंगळुरू ते पाटणा विशेष साप्ताहिक सुपरफास्ट गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही ०२३५३ पाटणा-बंगळुरू प्रिमिअम विशेष साप्ताहिक गाडी पाटण्याहून १७ एप्रिल ते २६ जून दरम्यान (अकरा फेऱ्या) प्रत्येक गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ७ वाजून ३५ मिनिटांनी नागपूरला येईल. ७ वाजून ४५ मिनिटांनी रवाना होईल.
तिसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी बंगळुरू कँटोन्मेंटला पोहोचेल. ०२३५४ बंगळुरू-पाटणा प्रिमिअम विशेष साप्ताहिक गाडी बंगळुरू कँटोन्मेंटहून २० एप्रिल ते २९ जून दरम्यान (अकऱ्या फेऱ्या) प्रत्येक रविवारी दुपारी साडेतीन वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. पावणेदोन वाजता निघून तिसऱ्या दिवशी सकाळी पावणेदहा वाजता पाटण्याला पोहोचेल.मुगलसराय, जबलपूर, नागपूर, विजयवाडा व चेन्नई सेंट्रल येथे ही गाडी थांबेल. या गाडीला वीस डबे राहणार असून त्यात दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, नऊ शयनयान, दोन एसएलआर व एक भोजन डबा यांचा समावेश आहे.