तमाशा कलावंताचा फडातच मृत्यू

श्रीगोंदे तालुक्यातील हिरडगाव येथे यात्रेनिमित्त आलेल्या संध्या माने-सोलापूरकर या तमाशातील कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम सुरू असताना नवनाथ शेगर (रा. मेडद तालुका, माळशिरस, जिल्हा सोलापूर) याचा आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

श्रीगोंदे तालुक्यातील हिरडगाव येथे यात्रेनिमित्त आलेल्या संध्या माने-सोलापूरकर या तमाशातील कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम सुरू असताना नवनाथ शेगर (रा. मेडद तालुका, माळशिरस, जिल्हा सोलापूर) याचा आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हिरडगाव येथे नागनाथाची यात्रा आहे. या यात्रेसाठी संध्या माने यांचा तमाशाचा फड गावात आला आहे. तमाशात गावच्या सरपंचाची भूमिका करणारे नवनाथ शेगर यांना आज सकाळी हजेरी सुरू असताना त्रास जाणवू लागला, दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तमाशा फडावर शोककळा पसरली. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम दरेकर यांनी त्यांना मदत केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tamasha artist died

ताज्या बातम्या