बुलढाणा जिल्ह्य़ातील ३३३ गावांचे ७.१६ कटी
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत पुरस्कारप्राप्त विदर्भातील आठ जिल्ह्य़ातील एकूण ९३ कटींचा निधी शासन दरबारी थंडबस्त्यात पडल्याने चालू वर्षांत जाहीर झालेल्या तंटामुक्त समित्या व पदाधिकारी उदासीन झाल्या आहेत. राज्य पातळीवर बुलढाणा जिल्ह्य़ाने द्वितीय क्रमांक पटकावला. या चळवळीत २०१०-११ या वर्षांत ३३३ गावे, तसेच  २०११-१२ मध्ये २०१ गावे, अशी एकूण ५३४ गावे तंटामुक्त पुरस्कारास पात्र ठरली होती. यात २०१ पुरस्कारप्राप्त गावांचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्यात आलेला आहे, मात्र विदर्भातील सर्वच बाबतीत मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेपोटी या जिल्ह्य़ातील उपरोक्त गावांच्या पुरस्काराची सुमारे ७ क ोटी १६ लाख रुपये रक्क म, तसेच विदर्भातील आठ जिल्ह्य़ातील एकूण ९३ क ोटींचा निधी शासन दरबारी थंडबस्त्यात पडल्याने चालू वर्षांत जाहीर झालेल्या तंटामुक्त समित्या व पदाधिकारी उदासीन झाले आहेत.
राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम संपूर्ण राज्यभर राबविली व या चळवळीला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला, मात्र गाव पातळीवरील उत्साह द्विगुणित करण्याकरिता राज्य शासनाने घोषित केलेल्या पुरस्काराची रक्क म २०१० ते २०१३ शासनदरबारी रखडल्याने ही मोहीम थंडावत चालल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या जिल्ह्य़ातील ३३३ गावांनी तंटामुक्ती मोहिमेत सहभागी होऊन आपले गाव तंटामुक्त केले. बुलढाणा जिल्ह्य़ाला या मोहिमेत राज्यात द्वितीय, तर नगर जिल्ह्य़ाला प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान प्राप्त झाला. ज्या ग्रामपंचायतींनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी होऊन आपली गावे तंटामुक्त केली, अशा गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांचा १९ मे रोजी बुलढाणा जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आलेल्या आर.आर.पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, मात्र तंटामुक्तीचा पुरस्कार प्राप्त झालेल्या त्या ३३३ गावांना त्या पुरस्काराची रक्क म अद्याप मिळालेली नाही.
दरम्यान, या मोहिमेत सहभागी होऊन जिल्ह्य़ाचे व गावाचा नावलौकिक करणाऱ्या पुरस्कारप्राप्त गावांना पुरस्काराचा निधी केव्हा मिळणार, अशी चर्चा सुरू झाली असून या पुरस्काराचा निधी दरवर्षी १ मे रोजी देण्यात येतो, मात्र २०११-१२ मधील राज्यात तंटामुक्तीचा दुसरा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गावांना, तसेच राज्यातील तंटामुक्ती झालेल्या इतर गावांनाही अद्याप निधी प्राप्त झालेला नसल्याचे कळते. तरी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ पुरस्कार निधी संबंधित ग्रामपंचायतींना प्राप्त करून द्यावा, अशी मागणी तंटामुक्त पुरस्कार प्राप्त गावांमधून होत आहे. त्याचबरोबर विदर्भातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन तंटामुक्त पुरस्काराच्या रकमेकरिता शासनदरबारी तगादा लावण्याची गरज निर्माण झाली आहे.