दीपिका आणि रणबीरचे प्रेमप्रकरण जेव्हा चालू होते, तेव्हा दीपिकाने रणबीरच्या नावाचा टॅटू स्वत:च्या मानेवर गोंदवला होता. ह्रतिक आणि सुझाननेही त्यांच्या लग्नानंतर एक टॅटू आपल्या मनगटावर गोंदवून घेतला होता. पण दोघांच्याही बाबतीत ब्रेकअपनंतर या टॅटूचे करायचे काय, हा प्रश्न निर्माण झाला होता. सध्या हाच प्रश्न कित्येक तरुणांना हा प्रश्न भेडसावत आहे.
प्रेमप्रकरण सुरू झाले की, प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. मग जोडीदारासाठी आपण काहीपण करू शकतो, हे दाखवण्यासाठी टॅटू करून एकमेकांची नावे गोंदवून घेणे आता सर्रास केले जाते. पण यथावकाश ‘ब्रेकअप’ झाला की आता या टॅटूचे करायचे काय हा प्रश्न या प्रेमवीरांना पडू लागला आहे. दीपिका – रणबीरच्या ब्रेकअपनंतर दीपिका तिच्या टॅटूचे काय करणार, हा प्रश्न सर्व सगळ्यांनाच सतावत होता. पण तिने घाईने ‘राके’ चे रूपांतर फुलांच्या डिझाइनमध्ये करून घेतले. काडीमोड झाल्यावर सूझाननेही तातडीने मनगटावरील टॅटूचे डिझाइन बदलून घेतले होते. शरीरावरील गोंदण कायमस्वरूपी राहते. शस्त्रक्रिया करून काढण्यात प्रचंड खर्च येतो. त्यामुळे त्या टॅटूमध्ये फेरबदल करणे हाच एकमेव पर्याय त्यांच्याकडे असतो. म्हणूनच आता प्रेमवीरांचा मोहरा पुन्हा एकदा टॅटू पार्लर्समध्ये वळू लागला आहे. मग त्या टॅटूचे रूपांतर वेगळ्या डिझाइनमध्ये करण्याचा प्रयत्न केला जातो. कित्येकजण आपल्या प्रियकराबद्दलचा राग या बदललेल्या टॅटूमधून व्यक्त करतात, तर कधी त्याचे रूपांतर छानशा डिझाइनमध्ये करतात. काहीजण तर आपल्या जोडीदाराचे एखाद्या सेलेब्रिटी किंवा बॅण्डच्या नावाशी मिळतेजुळते असेल, तर सरळ ‘आय लव्ह’ म्हणून त्या सेलेब्रिटीचे नाव लिहितात. पण ब्रेकअपनंतर टॅटूचे करायचे काय, या प्रश्नाचे सगळ्यात सोपे उत्तर आहे ते म्हणजे जोडीदाराचे नाव एखाद्या परकीय भाषेत गोंदवून घेणे. म्हणजे मग ब्रेकअपनंतर ‘हे एका देवतेचे नाव आहे’ अशा आशयाची थाप मारणे सहजशक्य होते.

Story img Loader