scorecardresearch

जकात चोरी करणारे टेम्पो जप्त

जकात चुकवून जाणाऱ्या तीन टेम्पोंना पालिकेच्या करनिर्धारण विभागाने बुधवारी पाठलाग करून पकडले. हे तिन्ही टेम्पो जप्त करण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू आहे.

जकात चुकवून जाणाऱ्या तीन टेम्पोंना पालिकेच्या करनिर्धारण विभागाने बुधवारी पाठलाग करून पकडले. हे तिन्ही टेम्पो जप्त करण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू आहे. बुधवारी काही टेम्पो जकात चुकवून शहरात आल्याची माहिती विधी समिती अध्यक्ष महेश पारकर यांनी दिली होती. त्यानंर करनिर्धारण विभागाने सापळा रचून तीन टेम्पोचा पाठलाग करून पकडले. या टेम्पो चालकांनी अगरबत्ती आणि औषधे असल्याचे सांगत इलेक्ट्रॉनिक आणि केमिकलची वाहतूक केली होती. त्यापैकी एका टेम्पोने जकात न भरता प्रवेश केला होता. शहरात दररोज १ कोटी रुपयांची जकात चोरी होत असल्याचा संशय आहे. या जकात चोरांवर दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पारकर यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-05-2015 at 12:18 IST

संबंधित बातम्या