उरणमध्ये अपक्ष उमेदवाराचा पहिला अर्ज दाखल

उरण विधानसभा मतदारसंघात सोमवारी उरण उत्कर्ष समितीच्या वतीने गोपाळ पाटील यांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

उरण विधानसभा मतदारसंघात सोमवारी उरण उत्कर्ष समितीच्या वतीने गोपाळ पाटील यांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील हा पहिलाच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.निवडणूक प्रक्रियेला शनिवारपासूनच सुरुवात झालेली आहे. असे असले तरी राज्यातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर न झाल्याने कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. मात्र पाटील यांनी सोमवारी उरण तहसीलदार कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The first independent candidate nominations in uran