उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्य पोलीस दलातील २२९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांनी बोधचिन्ह व २१ जणांना सन्मानचिन्ह जाहीर केले असून त्यात विदर्भातील एकूण ५५ जणांचा समावेश आहे.
गोंदियाचे अधीक्षक शशीकुमार मीणा, नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य शशीकांत माने, गडचिरोलीचे अतिरिक्त अधीक्षक अंगद शिंदे, अहेरीचे अतिरिक्त अधीक्षक राहुल श्रीरामे, गडचिरोलीचे उपअधीक्षक मारुती जगताप, नागपूर शहरचे सहायक आयुक्त विनोद वानखेडे, एसआरपीएफ गट चारचे सहायक समादेशक श्रीधर खंदारे, सीआयडी नागपूरचे उपअधीक्षक रतन यादव, नागपूर ग्रामीणच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर चव्हाण, नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचेसेवकराम कोरे, वाशीमचे शेख अब्दुल रउफ, वर्धाचे मुरलीधर बुराडे, सीआयडी अकोलाचे गजानन शेळके, चंद्रपूरचे उपनिरीक्षक पांडुरंग दलाई, एसआरपीएफ गट चारचे रमेश मुंघाटे, गट तेराचे सहायक उपनिरीक्षक गजानन उके, चंद्रपूरचे अरुण नवघरे, नागपूर शहरचे माताप्रसाद पांडेय, बुलडाणाचे शांतीसागर जाधव, अमरावती शहरचे विष्णू काळसर्पे, नागपूर ग्रामीणचे हवालदार हरपाल इखार, गोंदियाचे राजेंद्र खापेकर, नागपूर ग्रामीणचे  रमाकांत बावीस्कर, सीमा नकीब अख्तर, वाशीमचे अरुण बडवे, बुलडाण्याचे शंकर पडोळ, सुभाष शेकोकार, नागपूर शहरचे प्रभाकर नांदे,रमेश धावंडे, यवतमाळचे विजय इंगोले, नायक शिपाई गोंदियाचे यादोराव गौतम, निलेशकुमार शेंडे, लक्ष्मण घरत, गडचिरोलीचे कृष्णा उसेंडी, प्रभाकर मडावी, शालिकराम कोवा, किरण अवचार, भंडाराचे विजय वंजारी, ललित टिकारिया, अकोलाचे गजानन दामोदर, सुनील धामोडे, विजय पाटील, नागपूर शहरचे अदपक राममूर्ती आदींना पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी बोधचिन्ह जाहीर केले.
गडचिरोलीचे उपनिरीक्षक सुधीर वाघ, नितीन बडगुजर, नायक शिपाई शगीर मुनीर शेख, पंकज गोडसेलवार, सरजू वेलादी, बन्नू हलामी, येशू तुलावी, संभाजी गुरव, भजन गावडे, कुमारशहा उसेंडी, एसआरपीएफ गट चार नागपूरचे सहायक उपनिरीक्षक जयचंद गौतम, अमरावती गट नऊचे राजेंद्र अवताडे आदींना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.