२१ व्या शतकात प्रथमच आठवडय़ातील एकमेव ‘पंचाक्षरी’ वार ‘मंगळवार’ ने व ‘अंगारकी चतुर्थी’ ने वर्षांची सुरूवात (१ जानेवारी) व मंगळवारनेच वर्षांचा शेवट (३१ डिसेंबर) होणाऱ्या २०१३ सालच्या तिथी १९९४ सालाप्रमाणे १९ वर्षांनी आल्याने, १९९४ प्रमाणे ‘महाशिवरात्र’ २०१३ मध्येही १० मार्चला (पण रविवारी) आहे. ६ सार्वजनिक सुट्टय़ा रविवारी असणार आहेत. २००२ सालचे कॅलेंडर (तारीख-वार सारखे) २०१३ मध्ये आल्याने, तारखेने मिळणारी प्रजासत्ताक दिना (२६ जानेवारी)ची सुटी २००२ प्रमाणेच चौथ्या शनिवारी, १४ एप्रिलची डॉ. आंबेडकर जयंतीची रविवारी सुटी, १९ फेब्रुवारीची छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीची मंगळवारी सुटी, १ मे, २ ऑक्टोबर व २५ डिसेंबरची बुधवारी सुटी, १५ ऑगस्टची गुरुवारी सुटी असून, योगायोगाने गुड फ्रायडेची सुटीही २००२ प्रमाणेच २९ मार्चला असणार आहे. थोडक्यात, ८ सुटय़ा २००२ प्रमाणेच आल्या आहेत.
१९९४ प्रमाणे श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी व मोरया गोसावी पुण्यतिथी २०१३ मध्येही प्रत्येकी २ वेळा असणार
आहे. १९९४ प्रमाणे, जानेवारीमध्ये २ संकष्टी
चतुर्थ्यां व मार्चमध्येही २ संकष्टी चतुर्थ्यां २०१३ मध्येही (१ व ३० तारखांना) असणार आहेत.मार्गशीर्षमधील  गुरुवारच्या लक्ष्मीव्रताचे ६ गुरुवार १९९४ प्रमाणे २०१३ मध्येही
आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या पुण्यतिथीला (१७ नोव्हेंबर) गुरु नानक जयंती व रविवार असून, जयंतीला (२३ जानेवारी) नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आहे. पंडित नेहरू जयंती (१४ नोव्हेंबर) मोहरमच्या दिवशी आल्याने, बच्चे कंपनी ‘बालदिना’ची सुटी मजेत साजरी करतील. ११-१२-१३ ही २१ व्या शतकातील शेवटची वैशिष्टय़पूर्ण तारीख असून, सोमवारी व फेब्रुवारीत संकष्टी चतुर्थी नसली तरी, १३ संकष्टी चतुर्थ्यां १३ सालात असून, विषम तारखांना १३ सार्वजनिक सुट्टय़ा (रविवार सोडून) असणार आहेत.
हरितालिका, वटपौर्णिमा, नागपंचमी, लक्ष्मीपूजन, रथसप्तमी हे ५ अक्षरी ५ सण रविवारी आल्याने, समस्त महिलावर्ग खुशीत राहील. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात (१ ते ५ नोव्हेंबर) दिवाळीचे महत्त्वाचे दिवस आल्याने, समस्त व्यापारी वर्ग व शेतकरी राजाही खुशीत राहील. (पीक हातात आल्याने) ९ ते १८ सप्टेंबर असा १० दिवसांचाच गणेशोत्सव भर पावसाळ्यात आहे. ८ सप्टेंबर (साक्षरता दिन) ला रविवारी हरितालिका व ९ सप्टेंबरला सोमवारी श्रीगणेशचतुर्थीची सुटी आल्याने, बच्चे कंपनी व कोकणात जाणारे चाकरमानी खुशीत राहतील.
महात्मा फुले जयंतीला (११ एप्रिल) गुढीपाडव्याची
तर, ९ ऑगस्टच्या क्रांतिदिनाला रमजानईदची सुटी असेल.
३० दिवसांचे वैशिष्टय़पूर्ण एप्रिल व सप्टेंबर
एप्रिल व सप्टेंबर या दोनही महिन्यांत तिथीने मिळणाऱ्या सुटय़ा असून, त्या विषम तारखांना आहेत. ११ एप्रिलला गुरुवारी गुढीपाडव्याची, १९ एप्रिलला शुक्रवारी श्रीरामनवमीची, २३ एप्रिलला मंगळवारी महावीर जयंतीची व ९ सप्टेंबरला सोमवारी श्री श्रीगणेशचतुर्थीची सुटी असणार आहे. दोनही महिन्यांतील संकष्टी चतुर्थ्यांना (२८ एप्रिल व २२ सप्टेंबर) रविवारची सुटी आहे. सहामाही हिशोबासाठी, १ एप्रिल व ३० सप्टेंबरला (प्रत्येक वर्षी हे दोनही दिवस एकाच वाराला येतात) बँक व्यवहार बंद असतात. २०१३ मध्ये हे दोन्ही दिवस सोमवारी आहेत. त्यामुळे, आदल्या दिवशी (३१ मार्च व २९ सप्टेंबर) रविवारची सुट्टी आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांनी, आपल्याला लागणारे पैसे, २८ सप्टेंबर व ३० मार्चला शनिवारी काढून ठेवणे योग्य होईल. (२९ मार्च व २ ऑक्टोबरला सुटी आहे.) १८ एप्रिलला गुरुपुष्यामृत आहे, तर १८ सप्टेंबरला अनंतचतुर्दशी आहे.
महिन्यात ५ रविवार : मार्च, जून, सप्टेंबर व डिसेंबर महिन्यांत प्रत्येकी ५ रविवार आहेत. १, ८, १५, २२, २९ तारखांना सप्टेंबर व डिसेंबर मध्ये रविवार आहेत. लक्ष्मीपूजन (३ नोव्हेंबर), गुरु नानक जयंती (१७ नोव्हेंबर), महाशिवरात्र, डॉ. आंबेडकर जयंती, पारसी नववर्ष दिन (१८ ऑगस्ट) दसरा (१३ ऑक्टोबर) अशा ६ सुटय़ा रविवारी!
आनंददायी पौर्णिमा
पहिल्या ६ महिन्यांतील पौर्णिमांपैकी फक्त फेब्रुवारी महिन्यात, माघ पौर्णिमेला (२५ फेब्रुवारी) विद्यार्थ्यांना शाळा असून, ५ महिन्यातील पौर्णिमांना विद्यार्थ्यांना शाळा नसल्याने, पौर्णिमेवर बच्चे कंपनी खूश राहतील. तर, मोठय़ांना २५ फेब्रुवारीच्या माघ पौर्णिमेला व २५ एप्रिलच्या चैत्र पौर्णिमेला कामावर जावे लागेल. बाकी ४ पौर्णिमांना रविवार किंवा अन्य कारणामुळे सुटी असल्याने मोठय़ा मंडळींना पण पौर्णिमा आवडेल. त्यातच जानेवारीतील (२७ जानेवारी, रविवार) शाकंभरी पौर्णिमेला जोडून ईद-ए-मिलाद (२५ जानेवारी, शुक्रवार) व प्रजासत्ताक दिनाची (२६ जानेवारी, शनिवार) जोडून सुटी असल्याने आणि मे महिन्यात बुद्धपौर्णिमेला (२५ मे, शनिवार) जोडून रविवारची (२६ मे) सुटी मिळाल्याने, नौकरदार मंडळी खुशीत राहतील.
मार्च व डिसेंबरमधील १० ते १९ तारखेतील अंकांच्या बेरजेची गंमत, गेल्या कित्येक वर्षांपासून प्रथमच
२ महिन्यांत पाहावयास मिळेल.  याप्रमाणे, १९-३-२०१३ किंवा १९-१२-२०१३ मधील अंक १, ९, ३ (किंवा १, २) २, १, ३ ची  बेरीज १९
तारीख                                                             तारखेतील अंकांची बेरीज१०-३-२०१३                     तारखेतील अंक १, ०, ३, २, १, ३ ची बेरीज १० च! (तारखेएवढी)            
१०-१२-२०१३                   तारखेतील अंक १, ०, १, २, २, १, ३ ची बेरीजही १० च!