नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्रात नवीन विद्युत रोहित्राची जोडणी करावयाची असल्याने गुरूवारी या केंद्राचा वीज पुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे नाशिकरोड भागात गुरूवारी दुपारी व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
नाशिकरोडच्या जलशुध्दीकरण केंद्रात गुरुवारी विद्युत रोहित्र बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्राचा वीज पुरवठा सकाळी आठ ते सायंकाळी सात या कालावधीत बंद ठेवावा लागणार आहे. वीज नसल्याने या दिवशी केंद्राचे काम पूर्णपणे बंद राहील. यामुळे गुरूवारी नाशिकरोड परिसरात दुपारी व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.