पुरवठा अधिकाऱ्याची नांदेडात उचलबांगडी

जिल्हा पुरवठा अधिकारी पी. एन. अहिरराव यांची अखेर उचलबांगडी झाली. त्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी येथे धडकले. राज्य सरकारने राज्यातल्या काही उपजिल्हाधिकारी संवर्गातल्या बदल्या १५ मार्च रोजी केल्या. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी बदल्यांचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवले.

नांदेडचे जिल्हा पुरवठा अधिकारी अहिरराव यांची आता नांदेडमध्येच विशेष भूसंपादन अधिकारी (लसिका) म्हणून बदली झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पद स्थापनेविना असलेले उपजिल्हाधिकारी भागवत देशमुख यांची नांदेडला जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
भोकरचे उपक्रमशील उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांचीही बदली झाली असून त्यांना अजून पदस्थापना दिली नाही.
जालना येथे कार्यरत असलेल्या केशव नेटके यांची भोकर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Transfer of supply officer in nanded

ताज्या बातम्या