जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार ठार, तर त्याचा सोबती गंभीर जखमी झाला.
यवतमाळ आर्णी मार्गावरील मनदेवच्या घाटात रविवारी घडली. एमएच ३१एपी. ४७४३ क्रमांकाचा ट्रक आर्णीहून यवतमाळकडे येत असताना आर्णीकडे जात असलेल्या मोटरसायकलला ट्रकने धडक दिली. त्यामुळे मोटरसायकलस्वार मोहन गावंडे (२७) हा आर्णी येथील तरुण ठार झाला, तर त्याचा मित्र नितीन दाभाडकर (२८) जखमी झाला. जखमी नितीनला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ट्रकचा चालक आणि वाहक घटनास्थळावरून फरार झाले. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.