दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

नव्याने बांधण्यात येणाऱ्या स्लॅबवरून पडून रामचंद्र लहू यादव (वय २२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा तरूण बार्शी भागातील आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यादव याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या बांधकाम व्यावसायिकाविरूद्ध पोलिसांनी कारवाई केलेली नाही. एवढेच नव्हे तर इमारत मालकाचे नावही पोलिसांनी दडवून ठेवले आहे.

नव्याने बांधण्यात येणाऱ्या स्लॅबवरून पडून रामचंद्र लहू यादव (वय २२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा तरूण बार्शी भागातील आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यादव याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या बांधकाम व्यावसायिकाविरूद्ध पोलिसांनी कारवाई केलेली नाही. एवढेच नव्हे तर इमारत मालकाचे नावही पोलिसांनी दडवून ठेवले
आहे.
दुसऱ्या घटनेत बैलाने मारल्याने सुखदेव चंद्रकांत वेताळ या ६० वर्षे वयाच्या वृद्धाचा मृत्यू झाला. याबाबत अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वेताळ हे वडझरे (ता. संगमनेर) येथील आहेत. बैलाने मारल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. साखर कामगार रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पण, औषधोपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संगमनेर पोलिसांकडे तपासाकरिता हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.      

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two died in two diffrent accident

ताज्या बातम्या