युनिमॅस अबॅकस संस्थेच्या वतीने येथील फ्रावशी अकॅडमीत ४ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आयोजित जिल्हा स्तरीय अबॅकस स्पर्धेत
उत्तर महाराष्ट्रातील १५ शाळांमधील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण ४५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आले.
बालवयातच मुलांची गुणवत्ता, कल्पना आणि बुद्धिमत्तेला चालना दिल्यास त्यांच्या भविष्यातील वाटचालीला एक वेगळी दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन यावेळी युनिमॅस अबॅकस संस्थेतंर्गत असलेल्या सीबीएस एज्युकेशनचे संचालक भानू रजपूत यांनी केले. अबॅकस प्रणालीमुळे मुलांची बौद्धिक पातळी, आकलन शक्ती व कल्पना शक्तीचा विस्तार होतो.
या प्रशिक्षणामुळेच गणिताविषयी असलेली भीती निघून जाते, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या  ४ ते १२ या वयोगटातील मुलांनी कॅलक्युलेटरचा वापर न करता विविध गणितांची उकल सहजपणे करून दाखविली.
नाशिक, धुळे व जळगाव येथील पालकांचा व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून युनिमॅस अबॅकस ही राज्यस्तरीय स्पर्धा पुढील वर्षी नाशिक येथे घेण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सागितले. सीबीएस एज्युकेशन संचालक भानु राजपूत यांनी व्यक्त केला.