प्रोटोकॉल बुकेचा मराठवाडय़ातही विस्तार

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला वानखेडे स्टेडियमवर दोनशेवा ऐतिहासिक व निरोपाचा सामना खेळते वेळी देशभरातून लाखो सचिनभक्तांनी शुभेच्छा संदेश पाठविले. लातुरातूनही पाच जणांनी फ्लॉवर अँड फ्लॉवर्समधून खास पुष्पगुच्छ पाठवून आगळ्या शुभेच्छा दिल्या.

फुले, प्लास्टिकचे बुके, फुलदाणी, शासकीय प्रोटोकॉलचे बुके, पुष्पचक्र, तसेच यापूर्वी कधीही चाखायला मिळाली नाहीत, अशी नसíगक फळे.. हे सर्व लातूरकरांना आता एकाच छताखाली मिळणार आहे. शासकीय प्रोटोकॉल बुके, पुष्पचक्र, ८० प्रकारचे टेबल स्टोन्स, कार डेकोरेशन, घर व रूम डेकोरेशन करून देण्याची सोय येथे उपलब्ध करण्यात आली आहे. फ्लॉवर अँड फ्लावर्स या कंपनीच्या माध्यमातून श्रीकांत रमेशचंद्र बाहेती या तरुण उद्योजकाने ही किमया साध्य केली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला वानखेडे स्टेडियमवर दोनशेवा ऐतिहासिक व निरोपाचा सामना खेळते वेळी देशभरातून लाखो सचिनभक्तांनी शुभेच्छा संदेश पाठविले. लातुरातूनही पाच जणांनी फ्लॉवर अँड फ्लॉवर्समधून खास पुष्पगुच्छ पाठवून आगळ्या शुभेच्छा दिल्या.
नगर जिल्हय़ातील अकोले हे मूळ गाव असलेल्या व सध्या नांदेडला स्थायिक झालेल्या श्रीकांत बाहेती या तरुण उद्योजकाने या व्यवसायात आगळेवेगळे यश प्राप्त केले. स्वत: बाहेती यांनीच पत्रकार बैठकीत या व्यवसायाबाबत माहिती दिली. कुठलीही परंपरा न जोपासता सायकलवरून रद्दी विकत, बगॅस व्यवसाय करीत बाहेती यांनी येथवर मजल मारली आहे. फुलांच्या व्यवसायात त्यांचे आज मोठे नाव आहे.
आपली यशोगाथा सांगताना बाहेती म्हणाले, की फुलांचा व अशा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांमध्ये मुंबईच्या एफ.एन.पी. ही कंपनी सध्या आघाडीवर आहे. फ्लोरिस्टा कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाहेती यांची फ्लॉवर अँड फ्लावर्स कंपनी तिसऱ्या स्थानावर आहे. या कंपनीच्या नांदेड, परभणी, जालना, औरंगाबादसह पुण्यात २ व बेळगाव येथे दहा शाखा आहेत. सोलापूर, नगर, नाशिक, वर्धा येथे लवकरच शाखा उघडण्यात येणार असल्याचे बाहेती यांनी सांगितले.
सचिनवर ‘पुष्पसुमने’!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुंबईत वानखेडे स्टेडियमवर दोनशेवा ऐतिहासिक क्रिकेट सामना होता. सचिनवर या वेळी संपूर्ण देशभरातून चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षांव केला. लातुरातील पाच जणांनी फ्लॉवर अँड फ्लॉवर्समधून त्याला खास पुष्पगुच्छ पाठवून आगळ्या शुभेच्छा दिल्या. भारतासह १५० देशांमध्ये घरपोच पुष्पगुच्छ पाठवण्याची सेवा या फर्ममध्ये उपलब्ध आहे. भारतात सध्या फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवरमध्येच नसíगक फुलापासून तयार केलेल्या राख्यांना मोठी मागणी असते. अशा प्रकारच्या राख्या विक्रीतून मिळणारा १०० टक्के नफा अंध मुलींसाठी दिला जातो. शासकीय प्रोटोकॉल बुके, पुष्पचक्र, ८० प्रकारचे टेबल स्टोन्स, कार डेकोरेशन, घर व रूम डेकोरेशन करून देण्याची सोय येथे उपलब्ध असल्याचे बाहेती यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unique best wishes to master blaster

ताज्या बातम्या