वीर जिवा महाले पुरस्कार शरद पोंक्षे यांना जाहीर

शरद पोंक्षे यांना यंदाचा वीर जिवा महाले पुरस्कार जाहीर झाला असून, शिवप्रतापदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शरद पोंक्षे यांना यंदाचा वीर जिवा महाले पुरस्कार जाहीर झाला असून, शिवप्रतापदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. येथील गणपती घाटावर (शिवतीर्थ) या वर्षीचा ३५४वा शिवप्रतापदिन सोमवारी (दि. ९) येथे होणार आहे. त्या वेळी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’चे नाटककार शरद पोंक्षे यांना वीर जिवा महाले पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्रतापगडावर शिवाजीमहाराजांनी केलेल्या पराक्रमाचा दिवस म्हणजेच शिवप्रतापदिन सोमवार (दि. ९) शिवतीर्थ गणपती घाट वाई येथे होणार आहे. या वेळी विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. विश्व हिदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आचार्य धर्मेद्रजी आदी मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. या वेळी शाहीर योगेश यांच्या कन्या व पुण्यातील तेजस्विनी महिला शाहीर पथक यांचा सवाद्य पोवाडय़ाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रतापगड उत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष संजय सणस यांनी केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Veer jiva mahale award declared to sharad ponkshe

ताज्या बातम्या