scorecardresearch

खासगी प्राथमिक शिक्षकसेवक समितीकडून ‘सीईटी’चे स्वागत

राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक भरती सामयिक प्रवेश परीक्षेने(सीईटी) घेण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पण शिक्षक भरतीवरील बंदी उठवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षकसेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केली आहे.

राज्याध्यक्ष रसाळे यांनी निवेदनात म्हटले आहे, की आम्ही सीईटीद्वारे शिक्षक भरतीचा निर्णय चांगला आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल व सामान्य स्तरातील हुशार मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तथापि यासाठी प्रथम शिक्षक भरतीवरील बंदी उठवून रिक्तपदे त्वरित भरली पाहिजेत. म्हणजे या निर्णयाची वास्तवता लक्षात येईल. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी अभ्यासपूर्वक शासनादेश काढून शिक्षक भरतीचे नियोजन केले पाहिजे. अन्यथा अनेक त्रुटी राहून शिक्षकपदाबाबत गोंधळ निर्माण होईल. कोणत्या संस्थेमध्ये किती पदे आहेत, ती कोणत्या प्रवर्गाची आहेत, कोणत्या विषयाची व शैक्षणिक अर्हतेची आहेत याची माहिती उपलब्ध करून घेणे तसेच स्वेच्छानिवृत्ती, आकस्मिक निधन, दीर्घकालीन रजा अशा कारणास्तव अनेक पदे आकस्मिकरीत्या निर्माण झाल्यावर त्यासाठी काय उपाययोजना करणार हे प्रश्न अनुत्तरित आहे. यासाठी शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती नेमून अहवाल घ्यावा. मगच या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी रसाळे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र ( Punenagar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Welcome to cet by private primary senior teacher committee

ताज्या बातम्या