सक्षमीकरणाकरिता निश्चयाने वागा

माझ्या गावात दारुबंदी झालीच पाहिजे, हुंडा देऊन मुलीचे लग्न करणार नाही, असे ठाम निश्चय करून महिलांनी आता पुढे आले पाहिजे. महिला संघटित होऊन स्वबळावर पुढे येत नाही तोपर्यंत सक्षमीकरण होणार नाही.

माझ्या गावात दारुबंदी झालीच पाहिजे, हुंडा देऊन मुलीचे लग्न करणार नाही, असे ठाम निश्चय करून महिलांनी आता पुढे आले पाहिजे. महिला संघटित होऊन स्वबळावर पुढे येत नाही तोपर्यंत सक्षमीकरण होणार नाही. त्यामुळे आता जागे व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी युवती मंचाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
भंडारा आणि गोंदिया महिला काँग्रेसच्यावतीने साकोलीच्या एम.बी. पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर  केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षां पटेल, मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या चित्रा वाघ, आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रात ४७ महिला बचतगट आहेत. भंडारा जिल्ह्य़ात दुधाचा व्यवसाय चांगला असून ७२ टक्के दुग्ध व्यवसाय महिला करीत असल्याचे सांगून, महिलांमधील आत्मविष्टद्धr(२२४)वास वाढविण्यासाठी मी आपल्यापर्यंत आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, महिलांमध्ये आत्मविष्टद्धr(२२४)वास वाढवायचा असेल तर त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनविण्याची गरज आहे. महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याच्या लाभ घेण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
 महिला सक्षमीकरणासाठी स्वस्त धान्य दुकान महिला बचत गटांना देण्यात येत आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी महिलांनी अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, माजी राज्यमंत्री व म्हाडा सभापती नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष धमंजय दलाल, माजी आमदार दिलीप बन्सोड, अर्बन बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. जयंत वैरागडे, होमगार्डचे जिल्हा समादेशक डॉ. श्रीकांत वैरागडे, प्रा. होमराज कापगते, प्रदेश सचिव नरेश डहारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर उपस्थित होते. आभार जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी मानले. या मेळाव्याला मोठय़ा संख्येने महाविद्यालयीन तरुणी उपस्थित होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Women should behave strongly supriya sule