श्री आनंदॠषी रुग्णालयाच्या माध्यमातुन गरजु व गरिब रुग्णांना गेल्या १३ वर्षांपासुन जैन सोशल फडरेशन अविरतपणे मोफत दिली जाणारी आरोग्यसेवा अनुकरणीय आहे, हे कार्य असेच पुढे सुरु रहावे, असा गौरव जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी केला.
आनंदॠषी रुग्णालय, लायन्स क्लब ऑफ सेवा यात्री यांच्यासंयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफथ नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शिबिरासाठी मिरची व्यापारी संघटना व साईसुर्य नेत्रसेवा प्रतिष्ठानने सहकार्य केले आहे. शिबिरात एकुण ५४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
संतोष बोथरा यांनी रुग्णालयाच्या माध्यमातुन सुरु असलेल्या कार्याची माहिती देताना परराज्यातुनही रुग्ण लाभ घेत असल्याचे स्पष्ट केले. डॉ. स्मिता पठारे, डॉ. वर्धमान कांकरिया, डॉ. श्रुतिका कांकरिया आदिंनी रुग्णांची तपासणी केली. श्रीमती मनिषा लोढा, अशोक मुथा, हरिकिसन मनिार, संजय लुंकड, रमेश गुगळे, सत्यनारायण बंग आदी उपस्थित होते.
कॅन्सर रुग्णांसाठी ६ ऑगस्टपासुन तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे. सवलतीच्या दरात मेमोग्राफी केली जाणार आहे, त्याचा लाब रुग्णांनी घ्यावा, असे अवाहन करण्यात आले.