आर्थिक अडचणीला कंटाळून सोलापुरात तरुणाची आत्महत्या

शहरातील अक्कलकोट रस्त्यावरील पद्मशाली स्मशानभूमीजवळच्या खुल्या मैदानात झाडाला गळफास घेऊन एका विवाहीत तरुणाने आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आर्थिक विवंचनेमुळे या तरुणाने आत्महत्या करून मृत्यूला कवटाळल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

राजू शिवाजी जिरगे (वय ३५, रा. मित्रनगर, शेळगी, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बेकार होता. त्यामुळे घरात प्रपंच चालविणे शक्य नव्हते. प्रापंचिक आर्थिक अडचणीला कंटाळून त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्याचे वडील शिवाजी जिरगे यांनी ही माहिती जेलरोड पोलीस ठाण्यात दिली.
लाखाची घरफोडी
विजापूर रस्त्यावरील माजी सैनिक नगरात राहणारे पंकज पुरुषोत्तम उपाध्ये यांची घरफोडी होऊन त्यात चोरटय़ांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख १० हजारांचा ऐवज लंपास केला. चोरटय़ांनी उपाध्ये यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील वाकवून आत प्रवेश केला व चोरी केली. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Young suicide due to economic problem in solapur

ताज्या बातम्या